Maha Forest महाराष्ट्र वन विभागात 2417 जागांसाठी मेगा भरती(मुदत वाढ)

Maharashtra Forest Department, Maha Forest Recruitment 2023 (Van Vibhag Bharti 2023/Maha Forest Bharti 2023) for 2417 Forest Guard (Vanrakshak), Accountant, Surveyor, Stenographer (HG), Stenographer (LG), Junior Engineer (Civil), and Junior Statistical Assistant Posts.

Total: 2417 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वनरक्षक (गट क) 2138
2 लेखापाल (गट क) 129
3 सर्वेक्षक (गट क) 86
4 लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब) 13
5 लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब) 23
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब) 08
7 वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) 05
8 कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क) 15
Total 2417

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 12वी (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) उत्तीर्ण  किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग – 10वी उत्तीर्ण
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  6. पद क्र.6: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका)
  7. पद क्र.7: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी
  8. पद क्र.8: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदवी

वयाची अट: 30 जून 2023 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.2: 21 ते 40 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 40 वर्षे
  4. पद क्र.4 ते 8: 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [राखीव प्रवर्ग/आ.दु.घ.: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2023  03 जुलै 2023

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online 

नैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा या युगातील राष्ट्रीय मुद्दा राहिला नसून तो कधीचाच आंतर्राष्ट्रीय झालेला आहे, वने नैसर्गिक स्त्रोतांचा अविभाज्य भाग असून त्यास अनन्यसाधारण असे महत्व आहे. दिवसागणिक होणारा पर्यावरणीय बदल व त्यावरील आधुनिक उपाययोजना म्हणून कार्बन sequestation करणे यात वनांचा मोलाचा वाटा आहे. राज्यातील विपुल आणि संपन्न जैवविविधता व तिचे संवर्धन करण्याचे दृष्टीने वन विभागाने नीतिगत धोरण अवलबून अंमलबाजवणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निसर्ग पर्यटनाचे माध्यमातून वन्यजीवांचे शास्वत व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. काष्ठ तसेच अकाष्ठ वनोपाजांचे उत्पादन व व्यवस्थान शास्त्रीय दृष्टीकोणातून करणे, तसेच संयुक्त वन व्यवस्थापनाचे माध्यमातून नैसर्गिक स्त्रोतांचे या शिवाय वनांवर अवलंबून असलेल्याचे जीवनमान उंचावण्याचे दृष्टीने सतत प्रयत्नरत राहणे अत्यावशक असून तसा प्रयत्न वनविभागामार्फत करणे अपेक्षित आहे. बांबू तसेच इतर वनोपजांवर आधारित मूल्यवर्धित वस्तु, स्थानिक हस्त कारागीर, मजूर यांचे राहणीमान उंचावण्याचे दृष्टीने प्रयत्न करणे प्रस्तावित आहे. एवढेच नव्हे तर भोगौलिक क्षेत्राच्या 33% टक्के वनाच्छादन करण्याकरिता प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञान सारख्या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून e- governnace चे माध्यमातून प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्याचा शासनाचा मानस आहे.(source:- https://mahaforest.gov.in/index.php/.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top